The3rone

मई 14, 2014

देव कसा आहे?

Filed under: God, Jesus, Spirit, life — the3rdone @ 4:01 अपराह्न
Tags: , ,

देव जो पिता, तो स्वर्गात आहे. कोणाही माणसाने त्याला कधी पाहिले नाही. देव जो पुत्र म्हणजे प्रभु येशु. लहान बाळ बनून तो या जगात आला आणि 33 वर्षे येथे राहिला. आमच्या पापांसाठी तो वधस्तंभावर मरण पावला; त्याला पुरले गेले; पण तिस्र्या दिवशी तो मरणातून उठला. तो आमचा जिवंत तारक आहे. देव जो पवित्र आत्मा, जो दिसू शकत नाही पण खराखुरा व्यक्ती असून, पिता आणि पुत्र यांच्यासमान त्याचे सामर्थ्य आणि गौरव आहे.

देव सर्वत्र आहे. आपण मानव असल्यामुळे आणि आपल्याला शरीर आसल्यामुळे आपण एका वेळी फक्त एकाच ठिकाणी असू शकतो। पण देव हा आत्मा असल्यामुळे देव एकाच वेळी सर्वत्र असू शकतो। जगात आपण कोठेही गेलो तरी देव तेथे आपल्याबरोबर आहे। तो आत्मा असल्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही, पण तो नेहमी आपल्यासोबत असतो।

देव नीतिमान आहे. याचा अर्थ असा की देव नेहमी जे योग्य तेच करतो। देव पवित्र आणि नीतिमान असल्यामुळे सर्व पापाला शिक्षा देणे त्याला क्रमप्राप्त आहे। तो आमच्या पापांकडे डोळेझाक करू शकत नाही किंवा त्याविषयी त्याला काही कल्पना नाही असे तो भासवू शकत नाही। पण आमच्या सर्व पापांची क्षमा व्हावी म्हणून देवाने एक मार्ग तैयार केला आहे।आमच्या पापांसाठी मरण्यासाठी त्याने त्याचा पुत्र पाठवले।

देव विश्वसनीय आहे। याचा अर्थ असा की, देव नेहमी आपले वचन पाळतो। जे काही करण्याचे अभिवचन देव देतो, त्याप्रमाणे तो नेहमीच करतो। तो सत्यवचनी देव आहे।

देव बदलत नाही। देव नेहमी सारखा आहे। तो कधीही बदलत नाही।

देव सर्वज्ञानी आहे. देवाला सर्व काही माहीत आहे। आणि जे योग्य ते तो नेहमी करतो।

Advertisements

टिप्पणी करे »

अभी तक कोई टिप्पणी नहीं ।

RSS feed for comments on this post. TrackBack URI

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

w

Connecting to %s

वर्डप्रेस (WordPress.com) पर एक स्वतंत्र वेबसाइट या ब्लॉग बनाएँ .

%d bloggers like this: